Thursday, June 18, 2020

अंकलगी येथे डिझेल -पेट्रोल पंपाचे खासदार पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
अंकलगी (ता. जत) येथे जमदाडे यांनी सुरू केलेल्या शिवनेरी किसान सेवा केंद्र संचलित डिझेल- पेट्रोल पंपाचे उद्घाटन खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे उपस्थित होते. 
  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन देशातील अग्रगण्य कंपनी आहे.ग्रामीण भागातील जनतेला शिवनेरी किसान सेवा केंद्राच्या माध्यमातून जमदाडे कुटुंबीयांनी चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे, या दर्जेदार सेवेचा लाभ घ्यावा. अंकलगी व जवळपासच्या गावांना डिझेल- पेट्रोल साठी इतरत्र जावे लागत होते, परंतु या सेवा केंद्राच्या माध्यमातून चांगली सेवा मिळणार आहे. असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले.

    खासदार श्री. पाटील अंकलगी (ता .जत) येथे रेल्वे बोर्ड चे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सुरू केलेल्या इंडियन ऑइल डिझेल पेट्रोल विक्री, शिवनेरी किसान सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या पंपाचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले व त्यांनी सेवा केंद्रास शुभेच्छा दिल्या.
   यावेळी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी सभापती मंगल जमदाडे, शिवनेरी कंट्रक्शनचे दऱ्याप्पा जमदाडे , कंत्राटदार सचिन पाटील, इंडियन ऑइलचे श्रीराम मुंड  ,अंकलगी, सोन्याळ ,करजगी, कुलाळवाडी, बेळोडगी, उटगी येथील शेतकरी व पदाधिकारी उपस्थितीत होते.
       शिवनेरी किसान सेवा केंद्रास आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती मन्सूर खतीब, पंचायत समिती सदस्य रामण्णा जीवान्नवर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे ,मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष पाटील, दादासो माने, विठ्ठल निकम ,मच्छिंद्र खिलारे, प्रवीण जगदाळे, बाळकृष्ण शिंदे, महादेव जाधव ,परसराम बंडगर, बसवराज बिराजदार, शिवाप्पा तावशी , पट्टणशेट्टी , सोमनिंग बोरामणी , सिद्धू  शिरसाड प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment