Tuesday, June 9, 2020

उमदीत मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा

53 हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

जत (जत न्यूज वृत्तसेवा) -
जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उमदी ते सलगर या डांबरी मार्गालगत सुमारे 2 किमी अंतरावर दक्षिणेस असलेल्या पत्रा शेडमध्ये बेकायदेशीररीत्या सुपारी, तंबाखू व चुना यांचा वापर करून मशीनद्वारे त्याचा मावा  बनवण्याच्या कारखान्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना या ठिकाणी मावा बनवला जात असल्याचा व त्याच्या पुड्या बनवून विकल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकला असता दोघेजण माव्याच्या पुड्या बनवत असल्याचे निदर्शनास आले. जाफर लालासाब मसले (वय 31 वर्षे),  हैदर महंमद अली टपाल (वय 27 वर्षे) दोघेही राहणारे चडचण जि. विजयपूर (राज्य कर्नाटक) अशी या इसमांची नावे आहेत. छाप्या मध्ये एकूण 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर,पोलीस नाईक नितीन पलूसकर ,पोलीस नाईक श्रीशैल वळसंग, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश रामगडे यांनी सहभाग घेतला. जप्त मुद्देमाल तपासणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त अन्न  व औषध प्रशासन विभाग (सांगली) यांच्याकडे पाठविला असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उमदी पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment