Thursday, June 4, 2020

शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करा-श्रेयस नाईक

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये.  तसेच आता खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणीसाठी खते, बियाणे, औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे. कोरोना व्हायरस मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडली आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक  व बोगस बियाणे, खते -कीटकनाशके यांची जादा दराने विक्री होऊ नये व कोणत्या प्रकारची शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, याबाबत ग्रामस्तरावर आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी, तसेच कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढू न देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी ग्रामीण भागातील शासनाची महत्त्वाची पदे असलेली तलाठी,ग्रामसेवक, कृषीसहायक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे.
कोरोना व्हायरसने ग्रामीण भागात सुद्धा आता पाय रोवले असून बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीमुळे ग्रामीण भागातल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण होत आहे. जिल्ह्यात अशी बरीच प्रकरणे सापडली असून याबाबत शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहिली तर आवश्यक ती दक्षता,काळजी घेऊन कोरोणाचं संसर्ग ग्रामीण भागात कमी होऊ शकतो.यासाठीच गावातील प्रमुख शासकीय कर्मचारी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते बियाण्याची कुठलीही अडचण होणार नाही. पेरणी करता शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायकांनी त्यांच्या मुख्यालयी मुक्कामी राहून मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, व खरीप हंगामात त्यांना पेरणीसाठी फायदा होईल याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ योग्य ती पावले उचलून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक,कृषी सेवक,यानां मुख्यालय राहणे बंधनकारक करावे यासाठी आपण संबधीतांना आदेश काढावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष  श्रेयश नाईक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment