Sunday, June 28, 2020

हर्षवर्धन टोणे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील वायफळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा विद्यार्थी हर्षवर्धन ज्ञानेश्वर टोणे या विद्यार्थ्याची पलूस येथील  नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याचे पालक ज्ञानेश्वर सुखदेव टोणे हे सध्या बनाळी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम पहात आहेत. मुळचे वाळेखिंडी येथील हर्षवर्धन याने नवोदय प्रवेश परीक्षा दिली होती आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे गुणवत्तेनुसार त्यास केंद्रीय नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झाली आहे.
हर्षवर्धन याची नवोदयसाठी निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे व जत तालुक्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्याचे त्याच्या घरी जाऊन सन्मान केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी  आर. डी. शिंदे  व प्रशासनातील अधिकारी केंद्र प्रमुख व इतर सर्व शिक्षक,बंधू भगिनी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. यावेळी कृष्णा तेरावे,जकाप्पा कोकरे, अजिम नदाफ, केशव पंडित, बापू मुंडे, सुनील कच्चकलवार, उदय शिंदे, सुभाष शिंदे, सोपान बुरुंगले, नितीन वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment