Thursday, June 18, 2020

जतमधील गुंड राहुल काळे याचा संशयास्पद मृत्यू

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड राहुल काळे याचा संशयास्पद बुधवारी रात्री मृत्यु झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.  पोलिस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आशिर्वाद क्लासेस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. राहुल काळे व त्याचे दोन मित्र आंबे काढण्यासाठी गेले होते. भिंतीवरून उडी मारताना राहुल काळे याच्या पाठीचा मणका मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे जत पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून रात्रीच शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कारही रात्रीच करण्यात आले. जत येथील शिवाजी पेठेतील मेंढपाळनगर राहुल काळे हा राहात होता. त्याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी मध्यंतरी त्याच्याविरुद्ध कारवाई करून दीड महिने जेल मध्ये होता. त्यानंतर सध्या मात्र तो चांगले जीवन जगत होता. त्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्याच्या एका मित्राला जत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची काल गुरुवारी दिवसभर उलट-सुलट चर्चा सुरू होती.

No comments:

Post a Comment