Monday, June 8, 2020

सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी, वीज बिल, मालमत्ताकर माफ करा: श्रीकांत सोनवणे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोना लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य गरीब वर्गाला बसला असून, लॉकडाउन क्रलावधीत सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली, सर्वात जास्त फटका गरीब व सर्वसामान्य नागरिकांना बसला. त्यांना आता आधार म्हणून वीज बिल व घरपट्टी कराची रक्कम माफ करावी, अशी मागणी जत येथील सामाजिक कार्यकर्ते व जतचे भावी नगरसेवक श्रीकांत सोनवणे यांनी  राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असून, सततच्या लॉकडाउनचा मोठा फटका राज्यातील सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला बसला आहे. वीज बिलाची रककम माफ केल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळू शकतो. त्यामध्ये ऑटोचालक, मजुरी करणारा वर्ग, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा समावेश असून, ज्यांना १०० युनिटच्या आतमध्ये लाइट बिल येते अशा वीज ग्राहकांना वीज बिल, घरटॅक्स व पाणी कर माफ केल्यास त्यांची विस्कटलेली आर्थिकस्थिती सुरळीत होऊ शकेल, अशी श्रीकांत सोनवणे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment