Sunday, June 28, 2020

मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल  विविध संघटनांच्यावतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालवण्यात आलेल्या आश्रमाशाळांच्या उभारणीपासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत राहिलेले आणि शिक्षण संस्था नावारूपाला आणतानाच संस्थेचा विस्तार करण्यात मोलाचा हातभार लावलेले श्री. कारंडे या महिन्यात आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.
त्यांचा मागासवर्गीय शिक्षक संघटना, मराठी साहित्य सेवा मंच, प्राथमिक शिक्षक संघ यांच्यावतीने शाल,पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस संतोष काटे, शिक्षक संघाचे नेते पिराप्पा ऐवळे, भगवान नाईक, रामराव विद्यामंदिरचे शिक्षक बबन संकपाळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment