Monday, June 15, 2020

उटगीतील अतिक्रमण हटविण्याची सरपंचांनी मागणी

सोन्याळ, (जत न्यूज वृत्तसेवा)-
उटगी येथील गायरान भागातील सर्वे नं २ मधील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी उटगी सरपंच भिमाण्णा बिराजदार यांनी केली आहे.  जत तालुक्यातील उटगी येथील सरकारी हद्दीतील गायरान सर्वे नं २ मध्ये रोजगार हमी योजनेअंर्तगत ग्रामपंचायत उटगी मार्फत सात वर्षापूर्वी वृक्षलागवड केलेली आहे तसेच नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प , मैदानासाठी राखीव ठेवलेली खुली जागा, नियोजित पाण्याची टाकी बांधण्याची जागा याच परिसरात आहे गावातीलच अनेक नागरिकांनी गायरान जागेत अवैधरीत्या अतिक्रमण करून घराचे बांधकाम करत आहेत.
रोजगार हमी योजने अंर्तगत ग्रामपंचायत कडून लागवड केलेल्या झाडांची खुलेआम कत्तल केली आहे. सदर झाडांची खुलेआम कत्तल करणाऱ्यावर व अतिक्रमण करून गायरान जागेत बांधकाम करणाऱ्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र शासन मोहीम उत्तमपणे राबवत असताना उटगी येथे उलटाच प्रकार घडत आहे .ट्रक्ट ने दगड वाहतूक करत असून सदर वाहन धारकावर कार्यवाही करावी व अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी.
अतिक्रमण करणारया नागरिकांची नावे अशी:
गुरनिंगप्पा चंद्राम कोळगेरी,सिद्धप्पा रेवाप्पा कोळगेरी, महानंदा लायाप्पा इंचुर, शिवाप्पा सिद्धप्पा चिंतामणी, बसप्पा पराप्पा बगली,सदाशिव सिद्धप्पा करजगी, धरेप्पा रामू बालगाव, जयश्री शिवाप्पा बिराजदार, राजू
हणमंत चोंडीकर, अंबाण्णा हणमंत चोंडीकर,बसवंत भुजिंग कांबळे, श्रीशैल सिद्राया पुजारी, गंगव्वा यलाप्पा तेली, शिवाप्पा धुंडप्पा ढगारे,रामण्णा दुर्गमुर्गु, लक्ष्मण दुर्गमुर्गु, महिबूब मुल्ला (पानपट्टी) ,बेबी सौंड अशी आहेत. यांच्यावर तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करून अतिक्रमण हटवणेत यावे, अशी मागणी सरपंच बिराजदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment