Friday, July 10, 2020

होलार समाज संघटनेकडून 'कोरोना योध्दा' सन्मानित

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या कोरोनाच्या काळात जत तालुक्यात काही समाजसेवक जनतेसाठी रात्रंदिवस आपापल्या पद्धतीने सहकार्य करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय होलार समाज संघटनेने तालुक्यातील सहा समाजसेवकांना 'कोरोना युद्धा' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.  यामध्ये जतमधील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ  डॉ. रविद्र आरळी, कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स कॅबिनेट आॅफीसर राजेन्द्र आरळी, डॉ. नितिन पतंगे व सौ डॉ. प्रगती पतंगे, कवी शिक्षक सहदेव उर्फ एम जगदीश माळी, कवी व अभिनेता राजू सावंत या सर्वांना अखिल भारतीय होलार समाज संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात आले.

कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन असताना जनतेचे सेवक बनून हे सर्वजण उभे राहिले, प्रत्येकांनी आपापल्या परीने समाजासाठी अन्नदान, वैद्यकीय मदत व उपचार, जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, रूमाल, मास्क, डेटाॅल साबन, अर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप, कवितेच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन तसेच सल्ला मसलत करून कोरोनाशी कसे लढायचे हे त्यांनी दाखवून दिले व ते या जनतेसाठी रात्रंदिवस झटले याचीच दखल घेऊन या संस्थेने 'कोविड -19 योध्दा समाजरक्षक' सन्मान 2020 देवून त्यांचा गौरव करण्यात आला. समाजासाठी लढणे व झटणे यातून मानसिक समाधान लाभते व समाजचं काहीतरी देणं म्हणून हे सर्वजण आपापल्या परीने योद्धा बनुन लढत आहेत.

No comments:

Post a Comment