Sunday, July 5, 2020

व्हसपेठ येथील मोटारसायकल अपघातात सोन्याळचा शेळ्या-मेंढयांचा व्यापारी ठार

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
व्हसपेठ (ता.जत) येथे दुचाकी अपघातात  शेळ्या मेंढ्याचा व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. मयत  म्हाळाप्पा लक्ष्मण गारळे (वय ४० रा.सोन्याळ (गारळेवाडी २) येथील रहिवासी आहे.  अधिक माहिती अशी की , म्हाळाप्पा हा वळसंग येथील बहिणीकडे स्पेंलडर एम.एच. १०. बी. क्यु.६५१० गाडीने एकटाच कामानिमित्त व भेटण्यासाठी गेला होता.

गेला होता. रविवारी पहाटे तो गावाकडे भरधाव वेगाने येत असताना व्हसपेट जवळील डोंगरावरील वळणावर  दुचाकीचा अपघात झाला.गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली.  त्यात म्हाळाप्पाच्या डोक्याला जबर मार लागला.रक्तश्राव होऊन जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर वाहने नसल्याने मदत मिळाली नाही.
घटना व्हसपेठ येथील काही युवकांना समझल्यानंतर घटनास्थळी भेट दिली. जत पोलिस ठाण्यास महिती दिल्यानंतर जत पोलिसांनी जागीच पंचनामा करून शवविछचेदन जत येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दरम्यान म्हाळाप्पा दुचाकीवरून पडला की त्याच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. अधिक तपास जत पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment