Monday, July 6, 2020

जत तालुका बेकरी व स्वीट मार्ट अध्यक्षपदी विनय अय्यंगार व उपाध्यक्षपदी मिथून माने यांची निवड

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुका बेकरी व स्वीट मार्ट संस्थेच्या अध्यक्षपदी विनय अय्यंगार व उपाध्यक्षपदी मिथून माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महादेव अंदानी, सिध्दू माळी, मिलिंद माने, महादेव बडकुंद्री, यांच्यासह जत तालुक्यातील बेकरी व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष विनय अय्यंगार व उपाध्यक्ष मिथून माने म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेकरी व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. बेकरी व्यवसाय हा नाशवंत माल असल्याने या काळात नुकसानीचे ठरत आहे. त्यामुळे आम्ही शासनाचे नियम पाळून व्यवसाय करू, त्यामूळ शासनाच्या नियमा व्यतिरिक्त कोणत्याही बंदमध्ये सहभागी राहणार नाही. लवकरच जत तालुक्यात भव्य असा बेकरी व्यवसायिकांचा मेळावा आयोजित करणार असल्याचे सांगितले. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment