Tuesday, July 7, 2020

उमदी गुरुवारपासून सलग पाच दिवस बंद

जत (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमदी ग्रामपंचायतीने गुरुवारपासून सलग पाच दिवस उमदी गाव बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जत तालुक्याच्या सर्वच भागात आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून 'जनता कर्फ्यु' लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जत तालुक्यातील बिळूर येथे गेली अनेक दिवसापासून कोरोना विषाणू संसर्गाने उचल खाल्ली असून आतापर्यंत या गावात 62 रुग्ण संख्या झाली आहे. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातही  दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहेत. दरीबडची लमाणतांडा येथेही एक रुग्ण आढळून आला आहे. शिवाय आज उमदी जवळील जाडर बोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना  पॉझिटिव्ह आल्याने उमदीकर धास्तावले आहेत.
   जतच्या पश्चिम भागात अंकली, वाळेखिंडी, औंढी, अचकनहळ्ळी या भागाबरोबरच उमदी जवळील चडचण, संख, बोबलाद अशा ठिकाणीही कोरोना रुग्ण आढळून आल्याने उमदी ग्रामपंचायतीने उमदी गांव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवार नेहमी प्रमाणे सकाळी 7 ते 5 पर्येंत दुकाने व सर्व व्यवहार सुरळीत असणार असून लोकांनी पुढील पाच दिवसाची घरगुती साहित्य खरेदी करून साठवण करण्याचे, आणि गुरुवार पासून सलग पाच दिवस गांव बंद ठेवून व्यापारी वर्ग  व लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment