Sunday, July 5, 2020

राजे रामराव महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक मारुती चव्हाण सेवानिवृत्त

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 महाविद्यालयाच्या कर्मचारी व सेवकांमुळेच समाजात व शैक्षणिक क्षेत्रात राजे रामराव महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाकडे ४० वर्षे सेवा बजावलेल्या प्रयोगशाळा सहायक मारुती चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी प्रा. श्रीमंत ठोंबरे, प्रा. कुमार इंगळे, मनु मोरे, राम शिंदे, गजानन कुंभार रियाज गंजिवाले, तुकाराम शिंगाडे, नामदेव खुडे आदी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

  पुढे बोलताना डॉ. ढेकळे म्हणाले की, मारुती चव्हाण हे बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जत व मिरज शाखेमध्ये गेली ४० वर्षे प्रदीर्घ अशी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे. पदार्थविज्ञान विभागाकडे अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येतात. याचे नियोजन, मांडणी, मदत व प्रयोग करताना ते अत्यंत प्रामाणिकपणे ते करत. अशा संस्थेवर व महाविद्यालयावर मनापासून काम करणार्‍या व आपली सेवा विश्वासाने बजावणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्याची आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना कायम आठवण येत राहिल.  या सत्कार समारंभाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी. के. पुजारी यांनी केले.यावेळी निवडक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment