Friday, July 10, 2020

सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध करून द्या

सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणेंची मागणी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यात अनेक कृषी सेवा केंद्राचे दुकानात युरिया खताचा तुटवडा आहे, यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एनबेली युरीया खत मिळत नसल्याने सर्व शेतक-यांची अडचण होत आहे, याकरिता जत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात असे म्हटले की,जत तालुक्यात अनेक कृषी सेवा केंद्राच्या दुकानात अनेक दुकानदार खत नाही असे म्हणत आहे. या यामुळे सर्व शेतकऱ्यांची खत नसल्याने अडचण होत आहे. यात काही दुकानदारांकडे खत असून देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशावेळी सर्व कृषी सेवा केंद्राची कसून पाहणी करून व दुकानात माहिती फलक लावण्यास सांगावे तसेच तालुका कृषी नियंत्रण अधिका-र्यांना तत्काळ युरिया खताचा उपलब्ध करून युरीया खत वाटप करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्तेे श्रीकांत सोनवणे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment