Thursday, July 9, 2020

भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश बागडे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा) -
भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी उमदी (विठ्ठलवाडी) येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गणेश बागडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष पंढरी महादेव चव्हाण यांनी केली असून तसे नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.

पत्रकार  श्री. बागडे हे सध्या सामाजिक कार्यात अग्रेसर असून गरीब कुटूंबांना मदत मिळवून देण्याबरोबरच अनेक पातळीवर हिरीरीने काम करत आहेत. श्री.बागडे हे आखिल भारतीय कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. तसेच आपला माणूस पोलिस मित्र संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणुनही काम पाहात आहेत.या माध्यमातून पोलीस सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून साहाय्य केले आहे.  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्यातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी कार्यात सहभागी घेणं आपलं कर्तव्य असल्याचे सांगून श्री. बागडे म्हणाले की,  जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी दिवस-रात्र काम करीत राहणार आहे.

No comments:

Post a Comment